
कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय
हवेची गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींमधील कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे २०२५ मध्ये झालेल्या जनसुनावणीनंतर, हा बदल ३ ते ५ महिन्यांत लागू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाकूड किंवा कोळसा जाळल्यामुळे होणारे घातक उत्सर्जन रोखणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे, कारण हा घटक स्थानिक वायुप्रदूषणात मोठा वाटा उचलतो.
सिद्धेश कदम यांनी हा निर्णय घेताना 'सार्वजनिक आरोग्य' आणि 'व्यावसायिकांचे हित' यांचा सुवर्णमध्य साधला आहे. त्यांनी केवळ आदेश न देता, सर्व संबंधितांशी चर्चा केली, स्वच्छ पर्यायी इंधनांचे प्रस्ताव मांडले आणि बदलासाठी पुरेसा वेळही दिला. हा उपक्रम त्यांच्या 'संवेदनशील प्रशासक' या प्रतिमेचे दर्शन घडवतो, जिथे प्रदूषण नियंत्रण करतानाच समाजाला विश्वासात घेऊन बदलाकडे नेले जाते.


